आ.रोहीत पवारांना भाजपप्रणीत 'एनडीए'मध्ये येण्याचे निमंत्रण!

आ.रोहीत पवारांना भाजपप्रणीत 'एनडीए'मध्ये येण्याचे निमंत्रण!

पवारांनी दिला 'चोख' प्रतिसादनगर (सचिन कलमदाणे) : आपल्या कार्यशैलीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आ.रोहीत पवार यांनी अल्पावधीतच अनेकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर त्यांचं फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. यात सर्वपक्षीय समर्थक आहेत. अशाच एका फॉलोअरने ट्वटिटरवर आ.रोहित पवार यांना उज्वल राजकीय भवितव्यासाठी भाजप प्रणित एनडीए मध्ये येण्याचं निमंत्रण दिले. या फॉलोअरने लिहिले की, भाजप आणखी बराच काळ सत्तेत असणार आहे. महाविकास आघाडीत राहून तुम्हाला कधी मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार नाही. तुम्ही एनडीए मध्ये यायला हवं.

या ट्विटला आ.रोहित पवारांनी अतिशय संयत शब्दांत उत्तर दिले. आ.पवार यांनी लिहिलं की, "राजकारणात कुणाला कोणत्या पदावर बसवायचं हे जनता ठरवत असते. मी कुठल्या पदासाठी काम करत नाही,तसं असतं तर कदाचित आजवर पदही घेतलं असतं. NDA त प्रवेश करायचं म्हणाल, तर आपल्या मताचा आदर आहे, पण लोकशाहीत कोणताही पक्ष कायम सत्तेत नसतो, माझी शैली आवडत असेल तर आपणच एकत्र काम करुयात ना.!"Quote Tweet


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post