अनिल कराळे यांना श्रद्धांजली अर्पण करीत राजेश परजणे यांनी केलं महत्त्वपूर्ण आवाहन

 अनिल कराळे यांना श्रद्धांजली अर्पण करीत राजेश परजणे यांनी केलं महत्त्वपूर्ण आवाहन
नगर : जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांच्या निधनाबद्दल जिल्हा परिषद वर्तुळातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. सहकारी सदस्याच्या अशा एक्झिट मुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर जि.फ.सदस्य राजेश परजणे यांनी कराळे यांना श्रद्धांजली अर्पण करताना कराळे कुटुंबियांना सगळे मिळून धीर देतील असे सांगून करोनाकाळात प्रत्येकानेच काळजी घेतली पाहिजे असं मत व्यक्त केले आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकानेच पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. 

परजणे यांनी म्हटलं आहे की,  माझी सर्वच मित्र परिवाराला आव्हान आहे की आपण फक्त श्रद्धांजली वाहून चालणार नाही तर खरच अनिलभाऊ यांना ज्या आजाराने आपल्यातून घेऊन गेले त्यावर चिंतन करणे गरजेचे आहे.

आपण शासनाने जो शासन निर्णय घेतला त्याची कडकपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे,आपल्या जिल्हा परिषद मध्ये आपण सर्वसाधारण सभेत ठराव पण केला आहे,सर्वच जण एकत्रितपणे यासाठी पुढे यावे व या दिवाळीच्या वातावरणमध्ये असा वाईट प्रसंग कोणावरच येऊ नाही यासाठी कटिबद्ध होऊ.

मला मनस्वी फारच वाईट वाटले ,हुरहूर लागून राहिली कुटुंबातील सदस्य याना आता आपणच सर्वांनी धीर दिला पाहिजे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post