वाळू तस्कर, मटकावाल्यांना सरपंच करण्यासाठी आघाडी सरकारने रद्द केला 'हा' निर्णय

 वाळू तस्कर, मटकावाल्यांना सरपंच करण्यासाठी आघाडी सरकारने रद्द केला 'हा' निर्णय

भाजपचे माजी मंत्री सुरेश धस यांची टीका, नगर तालुक्यात विकासकमांचा शुभारंभनगर : महाराष्ट्रातील जनतेने भाजप, शिवसेना महायुतीला सत्ता स्थापनेसाठी कौल दिला. परंतु शिवसेनेने जनतेचा विश्वासघात करीत या तीन पक्षांनी सत्तेच्या लालसेपोटी व पदासाठी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेतून गावचा सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या सरकारने तो निर्णय रद्द करुन सदस्यातून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतल्यामुळे लोकशाहीचा अपमान करण्याचे काम केले.राष्ट्रवादीवाल्यांना वाळू तस्कर, मटक्‍यावाला तसेच लोकांची मुंडके मोडणाऱ्यांना सरपंच करावयाचे आहे. यासरकारने शेतकऱ्यांना दिलेले पॅकेज फसवे आहे. जनतेचा विश्वास संपादन हा कामातून मिळतो. तो फेसबूक व व्हॉटस्‌ऑपवर मिळत नाही. नगर-नाशिक जिल्ह्यामुळे भाजपची सत्ता गेली. दुधाचे भाव कमी झाल्यामुळे शेतकरी हवालदील होऊन कांदा उत्पादनाकडे वळला आहे. माजी मंत्री शिवाजी कर्डिले हे जनतेचे आयकॉन आहेत. आ.बबनराव पाचपुते व माजी मंत्री कर्डिले हे जनतेच्या विश्वासावर सर्व निवडणुका वेगवेगळ्या चिन्हावर लडवून निवडून येण्याचे काम केले. आता हे भाजपमध्येच राहितील, असे प्रतिपादन आ. सुरेश अण्णा धस यांनी केले.


पारेगवाडी (ता. नगर) येथे विविध विकास कामांचा शुभारंभ माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते
संपन्न झाला. यावेळी आ. बबनराव पाचपुते, आ. सुरेश धस, गावचे सरपंच राहुल शिंदे, मनोज कोकाटे, राहुल
पानसरे, राम पानमळकर, बाबा खडसे, बन्सी कराळे, दीपक लांडगे, राजेंद्र लांडगे, गणेश शिंदे, पोपट चेमटे, संजय
धोत्रे, मंगल शिंदे, वर्षा शिंदे, हिराताई गुंड,महेश ठुबे, भगवान ठोंबे, रवींद्र पालवे आदी उपस्थित होते.

यावेळी आ. पाचपुते म्हणाले की, केंद्रामध्ये मोदी सरकारचे निर्णय जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले
आहे. केंद्राची मदत कधीही शेतऱ्यांपर्यंत आली नव्हती. आम्ही कधीही जिल्हा बॅकेत संचालक म्हणून गेलो नाही.
जनतेच्या प्रश्नासाठी बॅकेशी संघर्ष नेहमी संघर्ष केला. माजी मंत्री कर्डिले यांनी बॅकेत जाऊन ती शेतकऱ्यांपर्यंत
घेऊन जाण्याचे काम केले असे ते म्हणाले.

माजी मंत्री कर्डिले बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारने गावच्या विकासाला चालना देण्यासाठी थेट
ग्रामपंचायतला निधी देण्याचे काम केल्यामुळे गावच्या विकासाला चालना मिळाली. पारेवाडी गावचे सरपंच राहुल
शिंदे यांनी आपल्या कामातून गावातील नागरिकांचा विश्वास संपादन केला. गेली १५ वर्षापासून गावामध्ये मोठी
विकास कामे केली आहेत. युवकांनी राजकारणात येऊन चांगल्या कामाचा ठसा उमटवावा. राजकारण करत
असताना नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. आम्ही आमदार असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्याकडून मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध केला. परंतु आताचे आमदार, मंत्री आम्ही मंजूर केलेल्या
विकास कामांचे उद्घाटन करत असतात. त्यांनी भूमिपूजन करण्याच्या आधी तारखा पाहून उद्घाटने करावीत.
भाजप सरकारने दुधाला भाव देण्याचे काम केले. जनतेच्या सेवेशिवाय पद मिळत नाही. जनता हीच भांडवल
समजून काम करावे. असे ते यावेळी म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post