पंजाब अँण्ड सिंध बंकेच्यावतीने सतर्कता जागरुकता सप्ताहाचे आयोजन

 पंजाब अँण्ड सिंध बंकेच्यावतीने सतर्कता जागरुकता सप्ताहाचे आयोजन

तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जागरुकतेची गरज : संतोष चौधरीनगर : सतर्क भारत, समृद्ध भारत, शास्वत भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहण्याची
गरज आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या क्षेत्रातील माहिती असावी. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये
दररोज नवनवीन बदल घडत असतात. बॅकिंग क्षेत्र हे डिजिटल क्षेत्र झाल्यामुळे प्रत्येकाने आपआपल्या खात्याची
सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. यासाठी या तंत्रज्ञानाची माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी बॅकेच्यावतीने सतर्कता
जागरुकता सप्ताहाचे आयोजन करून गेल्या ८ दिवस खातेदार, कर्जदार व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम
केले. वृक्षाच्या वाढीसारखे समाजामध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन बॅकेच वरिष्ठ व्यवस्थापक संतोष
चौधरी यांनी केले.

पंजाब अँण्ड सिंध बॅकेच्यावतीने सतर्कता जागरुकता सप्ताहानिमित्त खातेदार व कर्जदार यांना वृक्षाचे वाटप
करताना बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक संतोष चौधरी. समवेत कमल खिलवानी, किशोर वेरूळकर, नितीन राठोड, पुनम
ननावरे, अभिजित भालेराव, आदिनाथ पवार, कन्हैय्यालाल भटेजा, पुरुषोत्तम जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी चौधरी म्हणाले की, गेले आठ दिवस बँकेच्या माध्यमातून सतर्कता जागरुकता सप्ताहानिमित्त विविध
सामाजिक उपक्रम राबवले. यामध्ये पर्यावरण समतोलनासाठी वृक्षारोपन व त्याचे संवर्धन ही काळाची गरज ओळखून
खातेदार यांना वृक्षांची भेट देण्यात आले. त्या माध्यमातून प्रत्येक नागरिक एक झाड लावून त्याचे संवर्धन करील.
वृक्षारोपन व त्याचे संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. वृक्षारोपन ही लोकचळवळ व्हावी,
यासाठी बॅक या पुढील काळात काम करील. विभागीय व्यवस्थापक बी. कनन व दक्षता ऑफिसर अशोक गणपते
यांच्या मार्गदर्शनाखाली बॅक वर्षभर नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post