कल्याण रोड परिसराचा पाणीप्रश्नासाठी पाणीपुरवठा विभागाची बैठक

 कल्याण रोड परिसराचा पाणीप्रश्नासाठी पाणीपुरवठा विभागाची बैठक

सात दिवसात पाणीप्रश्न मार्गी लावण्याचा निर्णयनगर : मनपा स्थायी समितीच्या सभेमध्ये कल्याण रोडचा पाणीप्रश्नावर चर्चा झाल्यानंतर सभापती मनोज कोतकर यांनी पाणीपुरवठा विभागाला या भागाचा पाणीपुरवठा सुरळित करण्याचे आदेश दिले. तसेच नगरसेवक अप्पा नळकांडे यांनी आंदोलनाचा इशारा देताच पाणीपुरवठा विभागाने काल संध्याकाळी वसंत टेकडी येथे टॅकर मालक, चालक, वॉलमन व इंजिनिअर यांची बैठक घेऊन सात दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन सुरू केले आहे. सर्वांना पाणी मिळेल, या हेतून सर्वांनी काम करावे. कोणीही हलगर्जीपण व कामचुकारपणा केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते यांनी सूचना केल्या.
यावेळी नगरसेवक अप्पा नळकाडे व सचिन शिंदे यांनी या बैठकीत बोलताना सांगितले की, कल्याणरोडचा
पाणीप्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. हा पाणीपुरवठा सुरळित करणे गरजेचे आहे. पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत असून त्यांना पाण्यासाठी ताटकळत रहावे लागत आहे. यासाठी आणखीन दोन टॅकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच टॅकर चालकांची पैसे घेण्याबाबतची चौकशी होऊन कारवाई करण्यात येईल असे यावेळी सांगितले. 
कल्याण रोड परिसरात अनेक भाग नव्याने विकसित होत आहे. या ठिकाणी अजूनपर्यंत पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यात आले नाहीत. तरी त्या लवकरात लवकर टाकून सर्व नागरिकांना नळाद्वारे पाणी देण्याची सुविधा उपलब्ध करावी. फेज टू पाणी योजनेचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, या कामाला गती द्यावी. ही योजना पूर्ण झाल्यानंतर सर्व भागाला मुबलक पाणी उपलब्ध होईल व महापालिकेचा टॅकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा लाखो रूपयांचा खर्च कमी होईल. यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येईल, असे नगरसेवक नळकांडे म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post