नगर जिल्हा परिषदेच्या निर्णयाचे लातुरात अनुकरण

 नगर जिल्हा परिषदेच्या निर्णयाचे लातुरात अनुकरण

आई वडीलांचा सांभाळ न करणार्यांच्या पगाराबाबत घेतला 'हा' निर्णयलातूर : शासकीय नोकरी, सातव्या वेतन आयोगाचा भरगच्च पगार अनेकजण वृद्धपकाळात आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात. अनेकजण सांभाळही करीत नाहीत. यावर पर्याय म्हणून लातूर जिल्हा परिषदेने अनोखा ठरावच सर्वसाधारण सभेत घेतला आहे. जो कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करीत नाही, त्याच्या पगारातून 30 टक्के रक्कम ही आई-वडिलांना उदरनिर्वाहसाठी मिळणार आहे. 


वृद्धपकाळात मुलांना आई-वडिलांच्या कष्टचा विसर पडतो. अनेकांना नीटनेटकी वागणूकही मिळत नाही. परिणामी मुलगा शासकीय नोकरदार असताना त्यांना वृद्धपकाळात आश्रमात दिवस काढावे लागतात. . जो कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करीत नाही त्यांच्या पगारातील 30 टक्के रक्कम ही थेट आई-वडिलांच्या खात्यांमध्ये वर्ग केली जाणार आहे. हा अनोखा मुद्दा मंचकराव पाटील यांनी उपस्थित केला होता.

अहमदनगर जिल्हा परिषदेने याच धर्तीवर ठराव घेतला आहे. त्यानुसार लातूर जिल्हा परिषदेनेही असा निर्णय घेण्याच्या सुचना मंचकराव पाटील यांनी केल्या होत्या. यावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी त्वरित सहमती दर्शविली. एवढेच नाही तर केवळ शिक्षकलाच नाही तर इतर कर्मचारी यांनाही हा नियम लागू करता येईल याची माहिती घेण्यास सांगितले आहे. जे शिक्षक बदलीसाठी किंवा रजेसाठी आई-वडिलांच्या तब्येतीची कारणे पुढे करतात आणि दुसरीकडे त्यांच्या सांभाळाची वेळ येते तेव्हा दुर्लक्ष करतात. त्यामुळे हा  निर्णय घेण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post