ऑलंपिकवीर खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करा
नगर : ऑलंपिक स्पर्धेमध्ये कुस्तीक्षेत्रात स्व. पै. खाशाबा जाधव यांनी देशाचे नेतृत्व करून पदक मिळवून दिले.
त्यामुळे कुस्ती क्षेत्राचा नावलौकिक पूर्ण जगामध्ये गेला. महाराष्ट्राला कुस्ती क्षेत्राची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. कुस्तीक्षेत्राला भरारी देण्यासाठी आलंपिक वीर स्व. जाधव यांना केंद्र सरकारने मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यासाठी शहरातील कुस्तीपटूंना सह्यांचे निवेदन नरेंद्र मोदी यांच्याकडे आ. जगताप यांच्यमार्फत दिले आहे. यावेळी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, अफजल शेख, अनिल गुंजाळ, अस्लम शेख, केवळ भिंगारे, दीपक उमाप, सोयेश शेख, वाहिद शेख, फिरोज शेख यांच्या अनेक कुस्तीपटूंना या निवेदनावर आपल्या सह्या केल्या आहेत.
यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले की, कुस्तीपटूंच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्याचे काम करणार आहे. आजच्या युवकांना कुस्तीक्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी कुस्तीचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. पै. खाशाबा जाधव यांचा कुस्तीक्षेत्राचा इतिहास आजच्या युवकांना माहिती होण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. यासाठी केंद्र सरकारने स्व. खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करावा. त्यामुळे कुस्तीपटूंना एक प्रेरणा मिळेल. असे ते म्हणाले.
Post a Comment