अकरावीच्या सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन निशुल्क क्लासेस

 अकरावीच्या सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांचे निशुल्क ऑनलाईन क्लासेस 

नोंदणी करण्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आवाहन
मुंबई : राज्यातील इ. 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी कला, वाणिज्य व शास्त्र शाखेचे ऑनलाईन क्लास शालेय शिक्षण विभाग दि. 02 नोव्हेंबर 2020 पासून सुरू केले आहेत. इच्छूक विद्यार्थी  covid19.scertmaha.ac.in/eleventh येथे नावनोंदणी करून याचा लाभ घेऊ शकतात, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालयांचे कामकाज अद्याप बंदच आहे. दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरु होण्याची चर्चा असली तरी त्याबाबत ठामपणे सांगितले जात नाही. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात खंड पडू नये यासाठी शिक्षण विभागाने ऑनलाईन क्लासेसची व्यवस्था केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post