राज्यात करोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता कमी...पण...

 राज्यात करोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता कमी...पण...

दिवाळीनंतर मंदिरे खुली करण्याबाबत निर्णय : राजेश टोपेजालना : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. दुसर्‍या लाटेची शक्यता असली तरी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची पूर्ण तयारी आहे, असं राजेश टोपे म्हणाले. सध्या युरोपियन देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे तिकडच्या देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलंय. या संदर्भातल्या बातम्या आपण ऐकतो आहोत. साहजिकच आपल्याकडे देखील कोरोनाची दुसरी लाट येईल का अशी चर्चा सुरु आहे. मात्र आपल्याकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असं राजेश टोपे म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून आपण मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू सर्व अनलॉकिंग करायला सुरु केलं आहे. टप्प्याटप्प्याने सर्व सुरु होत आहे. याआधी लग्नसमारंभात 50 लोकांना परवानगी दिली होती. आता या संख्येत देखील वाढ करण्याचा विचार सरकार करत असल्याचं टोपे यांनी सांगितलं. दिवाळीनंतर यावर सरकार निर्णय घेणार असल्याचं सूतोवाच त्यांनी केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post