नितीश सरकारवर नामुष्की, तीन दिवसांत मंत्र्यांचा राजीनामा
पाटणा: नितीश कुमार यांनी सोमवारी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर सलग चौथ्यांदा ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शपथ घेणाऱ्या मंत्र्यामध्ये सहायक प्राध्यपक नियुक्तीत भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या डॉ. मेवालाल चौधरी यांचा देखील समावेश होता. त्यामुळे हा मुद्दा राजद व सीपीआय एमएलने उचलून धरला होता. अखेर सरकार स्थापन झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी आज(गुरुवार) डॉ. मेवालाल चौधरी यांनी शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
Post a Comment