विखे-पाटील यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना दिले भाजप प्रवेशाचं निमंत्रण
श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील दिग्गज नेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपत येण्याचं निमंत्रण दिले आहे.
रस्ते, पाणी व इतर प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर भाजपत येण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी भाजपत येण्याचे आवाहन विखे यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना केले. टाकळीभान येथे शुक्रवारी एका कार्यक्रमात विखे-मुरकुटे बोलत होते. विखे पाटील यांच्या आवाहनाला मुरकुटे यांनी 'माझी तालुक्यात स्वतंत्र आघाडी असल्याचं उत्तर दिले. असे असले तरी येथल्या काळात मुरकुटे यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे.
Post a Comment