पंडित नेहरु यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेसच्यावतीने अभिवादन

 पंडित नेहरु यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेसच्यावतीने अभिवादन

तत्कालीन काँग्रेसने समर्थन नाकारले होते - अनिल परदेशी



    

नगर- ) - इंदिराजींच्या पडत्या काळात तत्कालीन काँग्रेस नेते इंदिराजींना समर्थ कनण्यास राजी नव्हते. 1977 च्या पराभवनानंतर इंदिराजींच्या पाठिशी सामन्य कार्यकर्ते खंबीरपणे होतेत्यामुळे त्यांना नजिकच्या 1979 च्या मध्यवर्ती निवडणुकीत यश मिळाले होतेबदलत्या काळात मात्र सामान्यनिष्ठावान आणि ध्येयवादींना बाजूला सारुन सामाजिक कार्य नव्हे तर राजकारणाला महत्व प्राप्त झाले ही परिस्थिती बदलण्यासाठी 1977-78 प्रमाणे सामान्यांची एकजूट करण्याची गरज आहेत्यादृष्टीने आपण प्रयत्न करावेअसे आवाहन ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते अनिल परदेशी यांनी केले.

     पंडित नेहरु यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेस आयोजित कार्यक्रमात श्री.परदेशी अध्यक्ष म्हणून बोलत होतेते पुढे म्हणालेजवाहरलाल नेहरुंचे योगदान मोठे आहेत्यांच्यानंतर इंदिराजींनी देशाला खंबीर नेतृत्व दिलेआज देशाला ही अशा नेतृत्वाची गरज असूनयासाठी सामान्यांची एकजूट होणे गरजेचे आहे.

     यावेळी इंटकचे हनिफ शेखमाजी नगरसेवक रुपसिंग कदमअल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खानप्रदेश सदस्य शामराव वाघस्करज्येष्ठ सदस्या जरिणा पठाणआदिंनी समयोचित भाषणे केलीस्वागत भिंगार अध्यक्ष ॅड.आर.आर.पिल्ले यांनी केले तर प्रास्तविक शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले.

     प्रारंभी पंडित नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन झालेशहर सरचिटणीस अभिजित कांबळेउपाध्यक्ष अरुण धामणेआर.आर.पाटीलमाजी पोलिस निरिक्षक  उपाध्यक्ष एम.आय.शेखमहिला प्रदेश सदस्य शारदा वाघमारेरजनी ताठेमीना धाडगेनिजाम पठाणॅड.नरेंद्र भिंगारदिवेविवेक येवलेविजय आहेरबाळासाहेब ठोंबरेसंतोष कांबळेसुभाष रणदिवे आदि यावेळी उपस्थित होतेसूत्रसंचालन राजेश सटाणकर यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post