बिहारचा अंतिम निकाल जाहीर, एनडीएला स्पष्ट बहुमत

 बिहारचा अंतिम निकाल जाहीर, एनडीएला स्पष्ट बहुमत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली प्रतिक्रियाबिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने स्पष्ट 125 जागा जिंकत बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. आता सर्व 243 जागांचे निकाल हाती असून एनडीए ने 125 जागा जिंकल्या आहेत तर महागठबंधननं 110 जागांवर विजय मिळवला. आहे. एनडीएच्या 125 जागांमध्ये भाजपने 74 जागा. जदयूने 43 तर मित्र पक्षांनी 8 जागांवर विजय मिळवला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून एनडीएला बहुमत मिळालं आहे आणि नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, बिहारमधील ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी-कामगार, व्यापारी-दुकानदार, बिहारमधील प्रत्येक घटकाने एनडीएच्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या घोषणेवर विश्वास ठेवला.  मी पुन्हा बिहारच्या प्रत्येक नागरिकांना आश्वासन देतो की आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक क्षेत्राच्या समतोल विकासासाठी पूर्ण समर्पणानं निरंतर काम करत राहू.


बिहारच्या माता भगिनींनी यावेळी विक्रमी संख्येने मतदान केले. आत्मनिर्भर बिहारमध्ये त्यांची भूमिका किती मोठी आहे हे त्यांनी दाखवून दिलं. आम्ही समाधानी आहोत की गेल्या काही वर्षांत एनडीएला बिहारच्या मातृशक्तीला नवीन आत्मविश्वास देण्याची संधी मिळाली. हा आत्मविश्वास बिहारच्या प्रगतीस सामर्थ्य देईल, असं पंतप्रधान म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post