महाविकास आघाडीत नाराजीचे ‘फटाके’, आमच्या मंत्र्यांच्या खात्यावर अन्याय

महाविकास आघाडीत नाराजीचे ‘फटाके’, आमच्या मंत्र्यांच्या खात्यावर अन्याय

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे मोठं वक्तव्यनाशिक : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगरविकास खात्याकडून कॉंग्रेसच्या नगर पालिका आणि महानगर पालिकांना निधी कमी मिळाला असल्याचे मान्य केले. मात्र, आगामी अर्थसंकल्पात ही त्रुटी दूर केली जाईल, असंही थोरात म्हणाले. आमच्याकडे असलेल्या खात्यांवरील अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. कॉंग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील काही दिवसांपूर्वी कॉंग्रेच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे म्हटले होते. वीजबिलांच्या प्रश्नावरुन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर टीका करणार्‍या चंद्रशेखर बावनकुळे यांनाही थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बावनकुळे वीजबिलाच्या प्रश्नावरुन काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post