मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्कचे नामांतर

 मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्कचे नामांतरमुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंच्या गर्जनेनं दणाणून जाणाऱ्या शिवाजी पार्कचं नाव बदलण्यात आलं आहे. ठाकरे सरकारने या पार्कचे नामांतर केले असून शिवाजी पार्क आता, 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' या नावाने ओळखले जाईल. अलीकडेच महापालिकेकडून या मैदानाला अधिकृत पाटी लावण्यात आली आहे. या मैदानाच्या नामांतराचा प्रस्ताव मार्च महिन्यात पालिका सभागृहात मांडण्यात आला होता. यापूर्वी मुंबईतील सर्वात मोठं टर्मिनस असलेल्या सीएसटीचंही असंच नाव बदलण्यात आलं होतं. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post