माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या 'त्या' वक्तव्यावर आ.चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया.... Video

 राज्यातील सरकारच्या गच्छंतीबाबत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या वक्तव्यावर आ.चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया.... Video
नगर (सचिन कलमदाणे) : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडी सरकार डिसेंबर पर्यंत जाईल व राज्यात भाजपचे सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला होता. कर्डिले यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी कर्डिले यांच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले की, "पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही अचानक जाहीर झाली, त्यासाठी अजून थोडा वेळ मिळावा म्हणून आम्ही निवडणूक आयोगकडे शिफारस केली आहे. राज्य सरकारमुळे सर्वसामान्य जनता त्रासली असून विरोधी मंडळींना त्रास देणे, अडचणीत आणणे चालू आहे.यामुळे शिवाजी कर्डिले यांनी वैयक्तिक मत व्यक्त केले." असे ट्विट भाजपने केले आहे.

कर्डिलेंचे मत त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून पाटील यांनी राज्यातील सरकारच्या भविष्याबाबत अधिक बोलणे टाळले.

Video
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post