‘हे’ नेते माझा फॉर्म भरायला न आल्याने पराभूत झाले : पंकजा मुंडे

 


‘हे’ नेते माझा फॉर्म भरायला न आल्याने पराभूत झाले : पंकजा मुंडे
औरंगाबाद : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे खासदार प्रीतम मुंडे यांचा फॉर्म भरायला आले आणि प्रीतमताईंचा विजय झाला, पण आमदारकीवेळी माझा फॉर्म भरायला आले नाहीत, मी पराभूत झाले असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मोठेपणा दिला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे उपस्थित होते. त्यानंतर पंकजांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रीतम मुंडे या दुसर्‍यांदा भाजपच्या तिकीटावर बीड मतदारसंघातून खासदार आहेत. दानवेंचा दौरा हा शुभशकुन असल्याचे सांगत पंकजांनी एकप्रकारे शिरीष बोराळकरांना विजयाची हमी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post