शिवसेनाप्रमुखांचे स्मारक की ‘मातोश्री तीन’?, मनसेकडून शिवसेनेला खोचक सवाल

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक की ‘मातोश्री तीन’?, मनसेकडून शिवसेनेला खोचक सवालमुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथील नियोजित स्मारकासाठी फक्त जागा घेतली आहे. मात्र अद्याप त्या ठिकाणी स्मारक का उभारलेले नाही?, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने स्मारकावरुन संदीप देशपांडे यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. स्मारक की मातोश्री तीन?? असा खोचक सवालही संदीप देशपांडे यांनी केला आहे. जर खरोखर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक असेल तर ते बंदिस्त का आहे? ते सर्वसामान्यांसाठी खुलं का नाही? जनता तिथे का जाऊ शकत नाही? कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं ते का वापरलं जातं? असे प्रश्नही संदीप देशपांडेंनी केले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post