महापौर वाकळे यांच्या ‘या’ आवाहनाला ‘मनसे’ विरोध

 महापौर वाकळे यांच्या ‘या’ आवाहनाला ‘मनसे’ विरोध

मनपाने फटाका स्टॉलला परवानगी का दिली? मनसेने फोडले टिकेचे फटाके\नगर : प्रदूषण तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर नगरचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिवाळीत फटाके न वाजविण्याचे आवाहन नगरकरांना केले आहे. मात्र महापौरांच्या या आवाहनावरुन मनसेने टिकेचे फटाके फोडले आहेत. महापौरांचा फतवा अजिबात पटलेला नसून हिंदू म्हणून आम्ही आमचे सण तितक्याच दणक्यात साजरे करणार असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परेश पुरोहित यांनी म्हटले आहे.

महापौर फटाके न वाजविण्याचे आवाहन करतात. त्याचवेळी महानगरपालिकेने शहरात फटाका स्टॉल टाकण्यास परवानगी दिली आहे. फटाके व्यावसायिकांकडून मनपा गाळे भाडे वसुल करणार आहे. फटाके वाजवायचे नाही तर या व्यावसायिकांचे काय? असा प्रश्न पुरोहित यांनी उपस्थित केला आहे. महापौरांचे आवाहन म्हणजे दुटप्पी भूमिका असून जर फटाके वाजवायचे नाही तर फटाके व्यावसायिकांचे गाळे भाडे माफ करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post