महाराष्ट्रातही उडणार निवडणुकीचा धुरळा

 महाराष्ट्रातही उडणार निवडणुकीचा धुरळा , विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 1 डिसेंबरला मतदानमुंबई : करोनामुळे थांबलेला निवडणुकांचा धुरळा आता उडणार आहे. याची सुरुवात राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांवरुन होणार आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघात ही निवडणुक होणार आहे.  1 डिसेंबरला मतदान होणार असून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाकडून राज्यात एकूण 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर 2 जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post