बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध लागेना, कुटुंबियांची चिंता वाढली, पोलिस अधीक्षकांना साकडं

 बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध लागेना, कुटुंबियांची चिंता वाढली, पोलिस अधीक्षकांना साकडंनगर : नगरच्या माळीवाडा परिसरातील गोंधळे गल्ली येथून बेपत्ता झालेला सार्थक किरण पठारे (बाल्या) या मुलाचा अद्याप शोध लागलेला नसल्याने चिंता वाढलीआहे. दि. 13 नोव्हेंबर रोजी घराजवळून गोंधळे गल्ली, बंगालचौकी, माळीवाडा जवळुन सार्थक बेपत्ता आहे. चार पाच दिवस होऊन देखील तो सापडला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुलाच्या घरच्यांसमवेत पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक दत्ता कावरे, मुलाचे कुटुंबिय उपस्थित होते. पोलिस अधीक्षक पाटील यांनी कोतवाली पोलिसांशी संपर्क साधून संबंधित मुलाचा शोध लवकरात लवकर घेण्याचे आदेश दिले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post