विघ्नहर्ता हॉस्पिटलनंतर 'त्या' अनोळखी महिलेला माऊली सेवा संस्थेचा आधार

विघ्नहर्ता हॉस्पिटलनंतर 'त्या' अनोळखी महिलेला माऊली सेवा संस्थेचा आधार

माऊली सेवा संस्था ही अनाथ व गरजूंसाठी देवदूत : डॉ. महेश वीरनगर : अनोळखी वृद्ध महिलेवर विघ्नहर्ता हॉस्पिटलने उपचार करून समाजामध्ये संवेदनशीलता दाखविली.
उपचारानंतर ती महिला पूर्णत: सुदृढ झाली असून त्यांची गेली १०-१२ दिवसांपासून आजपावेतो कोणीही संर्पक साधून ओळख पवटून दिलेली नाही. वृत्तपत्रामध्ये अनोळखी महिलेची बातमी वाचून माऊली सेवा संस्थेचे डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांनी डॉ. महेश वीर यांच्याशी संपर्क साधून त्या अनोळखी महिलेला विघ्नहर्ता हॉस्पिटलनंतर माऊली सेवा संस्थेने आपल्या सोबत घेऊन जाऊन आधार देण्याचे काम त्यांनी केले आहे. माऊली संस्था ही अनाथांची व गरजूंची आधार केंद्र आहे. डॉ. धामणे दाम्पत्य हे समाजातील अशा अनाथ व गरजूंसाठी खरे देवदूतच आहेत, असे डॉ.महेश वीर यांनी व्यक्त केले.

विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर अनोळखी महिलेला अनाथांची व गरजूंसाठी आधार केंद्र
असलेल्या माऊली सेवा संस्थेत आपल्या सोबत घेऊन जात असताना संस्थेचे डॉ. राजेंद्र धामणे, डॉ. सुचेता धामणे, डॉ.
महेश वीर, डॉ. अखिलेश धानोरकर, डॉ. अमित कुलांगे, डॉ. सुप्रिया वीर, डॉ. निलोफर धानोरकर, डॉ. प्राजक्ता पारधे,
डॉ. प्रशांत जाधव, डॉ. नरेंद्र मरकड, डॉ. शैलेंद्र मरकड आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी डॉ. धामणे म्हणाले की, समाजामध्ये ज्या अनाथ व गरजूंना कोणी नाही, त्यांच्यासाठी माऊली सेवा
संस्था काम करत आहे. वृत्तपत्रातून बातमी वाचल्यानंतर डॉ. महेश वीर यांच्याशी संपर्क साधून त्या अनोळखी महिलेची
विचारपूस केली. त्या महिलेला कोणी नसेल तर आम्ही घेऊन जाण्यासाठी येतो. विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या सर्व
संचालकांनी त्या अनोळखी महिलेवर वैद्यकीय उपचार करून समाजामध्ये संवेदनशीलता दाखविली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post