पंतप्रधान मोदींनीच मंदिरं बंदचे आदेश दिले होते,

 पंतप्रधान मोदींनीच मंदिरं बंदचे आदेश दिले होते, भाजपकडून फक्त राजकारण... Video

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री जयंत पाटील यांची भाजपच्या श्रेयवादावर टिकाअहमदनगर : “शिवाजी पार्क येथे शपथ घेऊन आम्हाला एक वर्षे पूर्ण झालं. हे एक वर्ष कसं गेलं हे भाजपला कळलं नाही. तर उरलेली चार वर्षदेखील कशी जातील हे त्यांना कळणार नाही”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. जयंत पाटील आज  भाऊबीज निमित्त नगरला आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली


मंदिरं बंद होती तर त्यांनी मंदिराबाहेर आंदोलन केली. खरंतर कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी मंदिरं बंद होती. मात्र, जाणीवपूर्वक आंदोलन करायची आणि आम्ही कसे भक्त आहोत ते दाखवायचं”

प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींचे होते. मोदींनीच मंदिर काय सर्वच बंद करायला सांगितलं होतं. आता विनाकारण मंदिरं खुले करण्यासाठी आंदोलन करुन कोरोनासारख्या संकटाची दिशा बदलण्याचे काम भाजप करु पाहत आहे”, असं जयंत पाटील म्हणाले


video सौजन्य: विक्रम बनकर0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post