'या' नामांकित कंपनीच्या ई दुचाकी आता नगरमध्येही उपलब्ध


 'महावीर ई बाईक्स' शोरुमचे शानदार उद्घाटन

फक्त 15 ते 20 पैसे प्रतिकिलोमीटर खर्चात राईडचा आनंद
 नगर : वायू प्रदूषण, पेट्रोलियम इंधनाचे वाढते दर अशा अनेक कारणांमुळे ईलेक्ट्रीक वाहनांना महत्त्व आले आहे. सरकारही अशा वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. प्रदूषण टाळणारी व चार्जिंगच्या कमी खर्चात अधिक मायलेज देणारी ई दुचाकी घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. नगरमध्ये महावीर ई बाईक्सने अशा ई दुचाकींची मोठी रेंज उपलब्ध करून दिली आहे. चांगली सेवा व दर्जेदार ई दुचाकींना मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास माणिकचंद उद्योग समूहाचे प्रकाश धारीवाल यांनी व्यक्त केला.


 नगरमध्ये आनंदधाम परिसरातील महात्मा फुले चौकात महावीर ई बाईक्स या इलेक्ट्रिक दुचाकींच्या शोरुमचे उद्घाटन प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आ.संग्राम जगताप, नगरसेवक प्रकाश भागानगरे, पुणे येथील आदिनाथ श्री संघाचे मदनलाल बलदोटा, शिरुरचे नगरसेवक देशमुख, उद्योजक विजय दुग्गड, मनोज बरलोटा, सचिन भंडारी, धनेश कोठारी, महावीर ई बाईक्सचे संचालक ऋषभ दुगड व दुगड परिवारातील सदस्य उपस्थित होते. धारीवाल यांच्या हस्ते प्रथम ग्राहक राहुल बोथरा आणि सुभाष गांधी यांना नवीन ई दुचाकींची चावी देण्यात आली. 
आ.संग्राम जगताप म्हणाले की, पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे ई दुचाकी वाहने काळाची गरज बनली आहेत. नगरमध्ये ई दुचाकींसाठी नामांकित कंपनीचे शोरुम सुरू झाले ही कोतुकाची बाब आहे. भविष्यात प्रत्येकालाच बॅटरीवर चालणारी वाहने वापरावी लागणार आहेत. हीच बाब ओळखून दुगड यांनी उद्याच्या काळातील एका मोठ्या व्यसायाचा पाया रचला आहे.
ऋषभ दुगड यांनी सांगितले की, हैदराबाद येथील नामांकित प्युअर ईव्ही या कंपनीच्या ई स्कूटर तसेच बॅटरीवरील सायकल याठिकाणी उपलब्ध आहेत.  प्युअर ईव्ही कंपनीची नगर जिल्ह्याची एकमेव डिलरशिप महावीर ई बाईक्सकडे आहे. ई स्कूटरचे चार मॉडेल सहा आकर्षक रंगसंगतीत उपलब्ध आहेत.  ई प्लुटो, ई प्लुटो 7 जी, एंट्रस प्लस, मोपेड ही चार मॉडेल हटके लूक असणारी असून तरूणाईसह सर्व वयोगटाला या स्कूटरव्दारे आरामदायी राईडचा आनंद मिळणार आहे. याशिवाय रेग्युलर तसेच बॅटरीवर चालणारी इट्रॉन प्लस सायकलही दालनात आहे. सर्व दुचाकींसाठी मजबूत लिथियम बॅटरीचा वापर केलेला असून बॅटरीवर तीन वर्षांची वारंटी देण्यात येते. किमान चार तास बॅटरी चार्जिंग केल्यावर सुमारे 70 ते 120 किलोमीटर बिनधास्तपणे दुचाकी चालू शकते. पेट्रोलच्या तुलनेत या चार्जिंगचा खर्च अतिशय कमी आहे. 15 ते 20 पैसे प्रतिकिलोमीटर खर्चात या ई दुचाकीची राईड करता येते. सदर वाहनांसाठी नामांकित कंपन्यांचे फायनान्स सुविधाही उपलब्ध आहे. लवकरच या कंपनीच्या ई बाईक्सही शोरुममध्ये दाखल होत असल्याचे दुगड यांनी सांगितले.  या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा दुगड परिवारातर्फे स्वागत व सत्कार करण्यात आला. विविध मान्यवरांनी शोरुमला भेट देऊन दुगड यांना शुभेच्छा दिल्या. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post