दिवाळीमध्‍ये फटाके वाजवू नये - महापौर बाबासाहेब वाकळे

दिवाळीमध्‍ये फटाके वाजवू नये - महापौर बाबासाहेब वाकळे 

      सात ते आठ महिन्‍यापासून संपूर्ण जगामध्‍ये कोरोना विषाणू मुळे हाहाकार माजला आहे. यामध्‍ये बरेच निष्‍पाप नागरिकांचा जीव गेला आहे. अनेक ना‍गरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्‍यातून ते बरे झाले. कोरोनाचे सावट अजूनही संपलेले नाही. नगर शहरामध्‍ये कोरानाचे रूग्‍णामध्‍ये ब-याच प्रमाणात घट झाली असून कोरोना वर मात करण्‍यासाठी नागरिकांनी मास्‍क, सोशल डिस्‍टसिंग, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्‍यक आहे. सध्‍या दिवाळी उत्‍सवामुळे बाजार पेठेत मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्‍कचा वापर करणे आवश्‍यक आहे. तसेच दुकानदारांनी देखील खरेदी करण्‍यासाठी येणा-या नागरिकांना मास्‍क लावल्‍याशिवाय दुकानात प्रवेश देवू नये. आपल्‍या दुकानातील कामगारांना देखील मास्‍क वापरणे बाबत सक्‍ती करण्‍यात यावी.  नागरिकांनी मास्‍कचा वापर केला नाही तर मनपास दंडात्‍मक कारवाई करावी लागेल.

     कोरोनाची दुसरी लाट येण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे. नागरिकांनी स्‍वत:ची काळजी घेवून कोरोनावर मात करण्‍याच्‍या दृष्टिने मा.शासनाने दिलेल्‍या निर्देशाचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग पाहता दिवाळी सणामध्‍ये फटाके वाजवू नये, फटाके वाजविल्‍यामुळे होणा-या प्रदूषणामुळे नागरिकांच्‍या फुफ्फुसावर विपरित परिणाम होवू शकतो त्‍यामुळे कोरोना रूग्‍ण व सर्व सामान्‍य नागरिक यांच्‍या आरोग्‍याला धोका निर्माण होतो. फटाके वाजवल्‍यामुळे शहरामध्‍ये मोठया प्रमाणात प्रदूषण होईल यादृष्टिने फटाके न वाजवता प्रदूषण मुक्‍त दिवाळी साजरी करावी. यामुळे नागरिकांचे आरोग्‍य चांगले राहील. मनपाच्‍या वतीने कोरोनासाठी आवश्‍यक असणारे उपाय योजना करित आहेत. परंतु नागरिकांनी देखील दिलेल्‍या निर्देशाचे पालन केल्‍यास कोरोनामुक्‍त शहर होण्‍यास मदत होईल. याकरिता नागरिकांनी बाजार पेठेत, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये व गर्दी असलेल्‍या ठिकाणी मास्‍कचा वापर करावा. तसेच शहर वासियांना दिवाळी सणा निमित्‍त हार्दिक शुभेच्‍छा देवून नागरिकांनी आपल्‍या आरोग्‍याची काळजी घ्‍यावी असे आवाहन मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post