नगर तालुक्यातही बिबट्या...बंदोबस्त करण्याची मागणी

 नगर तालुक्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करा - भाजपा नगर तालुक्यातील जेऊर, बहिरवाडी, ससेवाडी, रांजणी - माथनीसह परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असल्याचे  नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. याचीच दखल घेऊन भाजपा नगर तालुक्याच्या वतीने नगर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.सुनील थेटे यांना निवेदन देण्यात आले.


या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश पिंपळे, तालुका उपाध्यक्ष राजू दारकुंडे, उपसरपंच शंकर बळे, माजी उपसरपंच संजय येवले, उद्योजक विजय दारकुंडे, नवनाथ ससे यांच्यासह आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post