नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश...व्हिडिओ

बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश...व्हिडिओअहमदनगर: पाथर्डी तालुक्यात धुमाकुळ घालत तीन बालकांचा बळी घेणार्‍या बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आलं आहे. या बिबट्याने पाथर्डी तालुक्यात धुमाकुळ घातला होता. बिबट्याच्या हल्लयात 3 बालकांना आपला जीव गमावला होता. या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. पण बिबट्या हाती लागत नव्हता. अखेर आज पहाटे सावरगाव परिसरात बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलं. बिबट्याचा शोध घेण्यासाठी अहमदनगर, पुणे, जळगाव, औरंगाबाद, बीड मधून वनविभागाची पथके पाथर्डीत दाखल झाली होती. महिनाभरापासून या बिबट्याचा शोध सुरु होता. या दरम्यान त्याने तीन चिमुकल्यांचा बळी घेतला आणि एका गायीवरही हल्ला केला. अखेर आज पहाटे वनविभागाने रचलेल्या सापळ्यात बिबट्या अडकला.


व्हिडिओ सौजन्य : विक्रम बनकर0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post