स्थानिक गुन्हे शाखेचा कारभार अनिल कटके यांच्याकडे
नगर : जिल्हा पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांची बदली झाल्यापासून रिक्त असलेल्या एलसीबीच्या प्रभारीपदी अनिल कटके यांची नेमणूक झाली आहे. अनिल कटके हे कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी होते. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचा चार्ज देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी जारी केले आहेत. एलसीबीतील नियुक्तीसाठी अनेकांनी फिल्डिंग लावली होती. मात्र पोलिस अधीक्षकांनी कटके यांच्याकडे एलसीबीचा कारभार सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.
Post a Comment