पोस्टाच्या 'या' योजनेतील गुंतवणूक देते बॅंकेपेक्षाही अधिक परतावा

 पोस्टाच्या 'या' योजनेतील गुंतवणूक देते बॅंकेपेक्षाही अधिक परतावानवी दिल्ली:  सरकारी आणि खासगी बँकांनी मुदत ठेवींवरील एफ.डी. वरील व्याजदरात  कपात केली आहे. अशा परिस्थितीत, पैसे कुठे गुंतवावे असा प्रश्न  असेल तर यासाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. 

तुम्ही पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजनेत चांगल्या परताव्यासाठी आपले पैसे गुंतवू शकता. या योजनेत तुम्हाला वार्षिक व्याज 6.9 टक्के मिळेल. या योजनेत पैशाची गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकाला पोस्ट ऑफिसकडून बॉण्डच्या स्वरूपात प्रमाणपत्र दिले जाते. जी तुम्हाला देशातील कोणत्याही टपाल कार्यालयातून मिळू शकेल.


तुम्ही पोस्ट ऑफिसच्या KVP योजनेत जास्तीत जास्त पैसे गुंतवू शकता. मात्र या योजनेत आपण किमान 1000 रुपयांपर्यंत गुंतवणूक केली पाहिजे. आपण या योजनेतील गुंतवणूकीचे प्रमाणपत्र इतर कोणत्याही व्यक्तीस सहज हस्तांतरित करू शकता तसेच एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post