आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सचा हा खेळाडू अडचणीत, प्रमाणापेक्षा जास्त सोनं आणल्याने विमानतळावर घेतलं ताब्यात

 आयपीएल हून परतताना जास्त सोनं आणलं, क्रिकेटपटू कृणाल पांड्या डीआरआयच्या ताब्यातमुंबईः आयपीएल खेळून दुबई तून मुंबईत परतलेला क्रिकेटपटू कृणाल पांड्याला DRIच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर ताब्यात घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कृणाल पांड्याकडे निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त सोनं सापडल्यानंतर डीआरआयनं त्याला ताब्यात घेतलं आहे. मुंबई विमानतळावर जास्त सोनं आणल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल संपल्यानंतर कृणाल पांड्या भारतात परतत होता. दुबईहून येताना त्याच्याकडे जास्त सोनं सापडलं. त्यामुळेच डीआरआयनं त्याला ताब्यात घेतले आहे


कृणाल पांड्या मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. आयपीएल जिंकून कृणाल पांड्या गुरुवारी दुबईहून भारतात परतला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर DRIच्या अधिकाऱ्यांनी कृणाल पांड्याकडे चौकशी केली असता, त्याच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त सोनं सापडलं. त्यानंतर DRIच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post