प्राथमिक शिक्षक बँक कर्मचारी युनियन चे अध्यक्ष पदी किशोर शिंदे यांची निवड
प्राथमिक शिक्षक बँक कर्मचारी युनियन ची वार्षिक साधारण सभा अहमदनगर ज़िल्हा प्राथमिक शिक्षक सह बँक ऐक्य मंदिर, आनंदी बाजार, अहमदनगर येथे खेळीमेळीच्या वातावरण तकोरोना मुळे नियमाचे पालन करून ऑनलाईन पार पडली. नुकत्याच झालेल्या या सभेत सन 2020 -2021 सालंकारिता श्रीगोंदा शाखेचे शाखाप्रमुख किशोर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुरुवातीस माजी अध्यक्ष किसन कोल्हे यांनी मागील अहवाल सालात केलेल्या कामाचा अहवाल सभेत सादर केला. सर्व विषय सभेत मंजूर करण्यात आले. या निवडी प्रसंगी जनार्दन ठोंबल, गणेश पाटील, संजय चौधरी, अशोक पंदरकर, जयसिंग म्हस्के, अरुण आहेर, संजय खोडदे, सोसायटी चे चेअरमन अनिल भगत व सर्व संचालक व युनियन चे सदस्य ऑनलाईन उपस्थित होते. शेवटी नूतन अध्यक्ष किशोर शिंदे यांनी निवड केले बद्दल सर्वांचे आभार मानले. माझेवर टाकलेल्या विश्वासास तडा जाऊ न देता काम करण्याचे आश्वासन दिले. नूतन अध्यक्ष यांचे शिक्षक नेते मा.बापुसाहेब तांबे, बँकेचे चेअरमन,व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळ तसेच बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे यांनी अभिनंदन केले.
Post a Comment