राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही करोनाबाधित

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही करोनाबाधित मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. उपचारासाठी खडसे मुंबईकडे रवाना झाल्याचे समजते आहे. खडसे यांनी त्यांच्या संपर्कात आलेली लोकांना कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असेही ते म्हणाले आहेत

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रोहिणी खडसे यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post