दीपावलीनिमित्त कांदा मार्केट तीन दिवस बंद राहणार
अहमदनगर- दीपावली सणानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगरचे नेप्ती उपबाजार येथील कांदा लिलाव दि. 12 ते दि. 14 रोजी होणार नाहीत. हे तीन दिवस कांदा मार्केट बंद राहील. सोमवार दि 16 पासून नेप्ती उपबाजार कांदा मार्केट मध्ये कांदा लिलाव चालू राहतील. याची सर्व कांदा उत्पादक शेतकरी यांनी नोंद घ्यावी असे आवाहन बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, सचिव अभय भिसे यांनी केले आहे.
Post a Comment