भाऊसाहेब कबाडी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार.

 भाऊसाहेब कबाडी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार. अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील ओंकारनगर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.यासोबतच महाराष्ट्रातील १११ गुणिजनांच्या गौरवग्रंथात त्यांची मुलाखत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार सोहळा ऑनलाइन संपन्न झाला.अहमदनगर मनपा माजी उपायुक्त रामकिसन देशमुख, शंकरराव कबाडी,एल.आय.सी. विकास अधिकारी तुषार देशमुख,पत्नी वर्षा कबाडी यांच्या उपस्थितीत भाऊसाहेब कबाडी यांनी पुरस्कार स्वीकारला.

भाऊसाहेब कबाडी यांनी सहशिक्षक शिवराज वाघमारे, वृषाली गावडे यांच्या मदतीने  महानगरपालिकेच्या ओंकारनगर शाळेत सुमारे साडेतीन लाख रुपये लोकसहभाग मिळवून सर्व भौतिक सुविधा निर्माण केल्या.तसेच त्यांनी ओंकारनगर शाळेत पर्यावरणातून शिक्षण, शालेय परसबाग, कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग,क्षेत्रभेट व शैक्षणिक सहली, डिजिटल स्कूल,बालवाचनालय, विद्यार्थी बचत बँक,टॉयबॅंक,ज्ञानरचनावादी अध्यापन,बाल आनंद मेळावा, वार्षिक स्नेहसंमेलन, पाणीबचत,स्वच्छता, शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा मार्गदर्शन असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले.त्यामुळे शाळेची पटसंख्या ४ वरून ७९ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली.इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनीही शाळेत प्रवेश घेतला.त्यांच्या प्रयत्नांमुळे ओंकारनगर शाळेला आय.एस.ओ.मानांकन, उपक्रमशील शाळा पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे.कोरोना काळातही त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ऑनलाइन व ऑफलाईन शिक्षण, घरोघरी जाऊन शिक्षण देत सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवले.

मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार, उपशिक्षणाधिकारी संजय मेहेर, माजी उपायुक्त रामकिसन देशमुख,पर्यवेक्षक जुबेर पठाण,विकास अधिकारी तुषार देशमुख, केंद्र समन्वयक चंद्रशेखर साठे, अरुण पालवे,पित्रोडा सेल्सचे परेश पित्रोडा , राजेंद्र कटारिया, राहुल देशमुख,राज्यसचिव अरुण पवार, मनिषा शिंदे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रविण मुळे, उपाध्यक्ष रविंद्र पानसरे यांनी भाऊसाहेब कबाडी यांचे अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post