भाजपसमोर एकनाथ खडसेंना रोखण्याचे आव्हान, गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्याला खिंडार

 भाजपसमोर एकनाथ खडसेंना रोखण्याचे आव्हान, गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्याला खिंडारजळगाव : जामनेर भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्‌याला राष्ट्रवादीत अलिकडेच दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी  सुरुंग लावला आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघातील  भाजपमधील कार्यकर्त्यांचा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. 

जामनेर विधानसभा क्षेत्रातील देवपिंप्री आणि नेरी येथील 200 भाजप कार्यकर्त्यांनी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या उपस्थिती आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post