उद्योजक बनायचंय? थेट रेल्वेला उत्पादन विकण्याची संधी

 


आत्मनिर्भर व्यवसायासाठी थेट रेल्वेला उत्पादनं विकण्याची संधी
नवी दिल्ली : नवीन व्यवसाय, उद्योग सुरु करताना हमखास परतावा मिळेल अशी बाजारपेठ शोधण्याचे मोठे आव्हान असते. अशा आत्मनिर्भर उद्योजक, व्यावसायिकांसाठी भारतीय रेल्वे एक सक्षम पर्याय ठरु शकते. आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत भारतीय रेल्वे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सहभागी होण्याची संधी देत आहे. रेल्वे दरवर्षी साधारण 70,000 कोटींपेक्षाही जास्त किंमतीचे विविध उत्पादन खरेदी करते. यामध्ये टेक्निकल आणि इंजिनीअरिंग प्रोडक्ट्सबरोबरच दैनंदिन वापरल्या जाणार्‍या अनेक प्रॉडक्टचा समावेश असतो. अशावेळी एक छोटा उद्योजक म्हणून तुम्ही रेल्वेला तुमचं प्रोडक्ट विकू शकता. जर तुम्ही देखील रेल्वेबरोबर व्यवसाय करू इच्छित आहात तर https://ireps.gov.in/आणि https://gem.gov.in वर रजिस्ट्रेशन करू शकता. छोट्या उद्योगांना सुरक्षा ठेव आणि सुरक्षा ठेव रक्कम जमा करण्याच्या अटींमधूनही सूट देण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post