आयपीएल विजेत्यासह चार संघाची दिवाळी, मिळाले 'इतक्या' कोटींचे बक्षीस

आयपीएल विजेत्यासह चार संघाची दिवाळी, मिळाले 'इतक्या' कोटींचे बक्षीसदुबई : कर्णधार रोहित शर्माच्या दमदार खेळीच्या जोरावर आणि ईशान किशनच्या नाबाद 33 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएलंच विजेतेपद पटकावलं आहे. 

 अशी कामगिरी करणारा हा पहिलाच संघ ठरला आहे. या विजयामुळे आयपीएलकडून विजेत्या मुंबईच्या संघाला आयपीएलच चषक आणि 20 कोटी रुपये इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात आली आहे. तसेच उपविजेत्या दिल्लीच्या संघाला 12.5 कोटी रुपये बक्षीस स्वरुपात देण्यात आले. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघांना (सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर) 8 कोटींहून अधिक रक्कम बक्षीस स्वरुपात दिली जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post