ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या 'आयपीसी' कायद्यातील कलमं बदलणार

ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या 'आयपीसी' कायद्यातील कलमं बदलणार

केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांची माहिती नवी दिल्ली: ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेले भारतीय दंड विधानातील (आयपीसी) कलमं  बदलण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी याविषयी माहिती दिली. या निर्णयानुसार भारतीय दंड विधान (IPC) आणि दंड प्रक्रिया विधान (CrPC) पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. किशन रेड्डी आनंदी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या संमेलनात महिला सुरक्षा या विषयावर बोलत होते. केंद्राने यासाठी मुख्य न्यायाधीश, वरिष्ठ वकील, पोलीस अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि राज्य सरकारांशी पत्र व्यवहार देखील केल्याची माहिती रेड्डी यांनी दिली.


गृह राज्यमंत्री रेड्डी म्हणाले, आम्ही आयपीसी आणि सीआरपीसीमध्ये बदल करणार आहे. या अंतर्गत ब्रिटिश काळातील कलमं हटवली जाणार आहेत. वेळोवेळी आम्ही या कायद्यातील वेगवेगळ्या कलमांमध्ये बदल करत आलो आहे. मात्र, आता देशाची सध्याची स्थिती पाहता सरकारने IPC आणि CRPC पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post