इंदिरा गांधी यांच्या धाडसी निर्णयामुळे देश मजबूत: बाळासाहेब भुजबळ
नगर -1966 ते 1984 या दरम्यान काँग्रेस चळवळीत धाडसी व्यक्तीमत्व म्हणून इंदिराजी गांधी यांचे नेतृत्व होते. या थोर नेत्यांना आपण विसरु शकत नाही. स्वातंत्र्यानंतर देशाला सक्षम बनविण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. अनेक धाडसी निर्णयामुळे त्यांची कारकर्दी वादग्रस्त ठरली असली तरी त्यावेळी घेतलेले निर्णय हे भविष्यात देशहिताचे ठरले. त्यांच्या या दूरदृष्टीमुळेच जगात भारताविषयी वेगळी प्रतिमा निर्माण झाली, अशा शद्बात शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी इंदिराजींना आदरांजली वाहिली.
श्री.भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नगर शहर व भिंगार काँग्रेसने इंदिरा गांधी जयंती साजरी केली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास भिंगार पक्षाध्यक्ष अॅड.आर.आर.पिल्ले, पक्षाचा मायनॉरटीचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान व्यासपीठावर होते.
प्रारंभी इंदिराजींच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अॅड.पिल्ले, फिरोज खान, अनिल परदेशी, इंटकचे हनिफ शेख आदिंची भाषणे झाली. कार्यक्रमास सुभाष त्रिमुखे, महिला काँग्रेसच्या प्रदेश सदस्या शारदा वाघमारे, सुमन काळापहाड, मीना धाडगे, किरण अळकुटे, रजनी ताठे, आर.आर.पाटील, विवेक येवले, अॅड.नरेंद्र भिंगारदिवे, एम.वाय.शेख, सुभाष रणदिवे, शशिकांत पवार, वाघताई आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर दिवाळी फराळाच्या स्नेह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यास पक्ष कार्यकर्त्यांसहीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. शेवटी सरचिटणीस मुकुंद लखापती यांनी आभार मानले.
Post a Comment