शिक्षकांच्या गुरुमाऊली मंडळात ‘या’ तालुक्यातून इनकमिंग

 शिक्षक परिषदेचे राज्य नेते बाळासाहेब बिन्नर सहअकोले अकोले तालुका शिक्षक परिषदेचे अध्यक्ष सचिन गवांदे यांचा कार्यकर्त्यांसह शिक्षक संघ प्रणित गुरुमाऊली मंडळात प्रवेशअकोले -तालुका शिक्षक परिषदेचे अध्यक्ष सचिन गवांदे, शिक्षक परिषदेचे राज्य नेते बाळासाहेब बिन्नर, संजय गोरडे, किरण फापाळे ,कैलास सोनवणे आदींनी आपल्या कार्यकर्त्यांसह बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षक संघ, गुरुमाऊली मंडलात प्रवेश केला आहे. अकोले तालुका शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्यावतीने आयोजित गुणवंत शिक्षक ,विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात त्यांनी हा प्रवेश केला .यावेळी अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे, राज्य संघाचे सरचिटणीस आप्पासाहेब कुल, जिल्हा संघाचे तथा गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे चेअरमन श्री शरद भाऊ सुद्रिक , व्हाईस चेअरमन अर्जुन शिरसाठ,श्री साहेबराव  अनाप, राजेन्द्र सदगीर ,श्री बाळासाहेब मुखेकर, श्री गंगाराम गोडे, श्री राजू राहणे ,श्री किसन खेमनर राजकुमार साळवे, मच्छिंद्र लोखंडे, बाळासाहेब सरोदे ,दत्ता  आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ..यावेळी बोलताना श्री बाळासाहेब बिन्नर यांनी शिक्षक संघ व बापूसाहेब तांबे प्रणित गुरुमाऊली मंडळ शिक्षक बँकेत अतिशय पारदर्शी आणि सभासद हिताचा कारभार करत आहे. गेल्या वीस वर्षात इतका आदर्शवत कारभार यापूर्वी कधी झाला नाही .संचालक मंडळाने अनेक सभासद हिताचे निर्णय घेतले असून कर्जाचा व्याजदर सातत्याने कमी केला आहे. कायम ठेव यावर सतत वाढता व्याजदर दिलेला आहे .सभासद हिताला प्राधान्य दिले म्हणून चांगल्याला चांगले म्हणण्याची दानद आमच्यामध्ये आहे .इतका चांगला कारभार बँकेचा आणि शिक्षक संघाचा चालू  असल्यामुळे आम्ही शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळ प्रवेश करीत असल्याचे बाळासाहेब बिन्नर म्हणाले. यावेळी शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष सचिन गवांदे ,किरण फापाळे, संजय गोरडे ,कैलास सोनवणे यांनी बापूसाहेब तांबे व आप्पासाहेब कुल यांच्या हस्ते सत्कार स्वीकारून शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळात जाहीर प्रवेश केला .यापुढील काळात प्रामाणिकपणे तन-मन-धनाने शिक्षक संघ गुरुमाऊली मंडळात काम करू शिक्षक संघ वाढवण्याची जबाबदारी घेऊ, असे अभिवचन यावेळी त्यांनी दिले . या कार्यक्रमाला अकोले तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब आभाळे, गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष कैलास सारोक्‍ते ,महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रतिभा साबळे मॅडम , राम वाकचौरे,दीपक बोराडे बाळासाहेब आरोटे , भाऊसाहेब वाकचौरे ,संजय मुखेकर, प्रवीण साळवे ,पोपट ढोंनर, जयसिंग कानवडे, संभाजी दातीर ,केशव गोरडे ,माधव कांबळे ,मच्छिंद्र सुकटे, मारुती बांगर मीनाक्षी वर्पे ,श्रीमती साधना मंडलिक व अकोले तालुका शिक्षक संघाचे सर्व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post