राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच
मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमाला स्थगित देण्यात आली होता. मात्र, आता या निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. निवडणूक आयोग या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर करणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज दिली.
राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. मात्र, कोरोना संकटामुळे 17 मार्च 2020 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता”, असं मदान म्हणाले.
Post a Comment