राजकारणाचा व्याप सांभाळून शिवसेनेचे 'हे' मंत्री झाले 'पदवीधर'

 

राजकारणाचा व्याप सांभाळून शिवसेनेचे मंत्री  एकनाथ शिंदे झाले 'पदवीधर'मुंबई: राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाच्या 56 व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन शिक्षणाला वयाची अट नसते हे दाखवून दिले आहे. शिंदे यांनी पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. शिंदे यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयातून पदवीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत 77.25 टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले आहेत. वयाच्या 56व्या वर्षी पदवीधर होणारे ते राज्यातील बहुदा पहिलेच मंत्री असावेत. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे आले असता शिंदे यांनीच ते पास झाल्याची माहिती दिली. सगळ्यांनाच आपल्या मनासारखं शिक्षण घेता येत नाही. श्रीकांत डॉक्टर झाले. पण माझं शिक्षण अर्धवट राहिलेलं होतं. मनात शिक्षणाची जिद्द होती. तळमळ होती. शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे पदवीधर व्हायचंच अशी मनाशी खुणगाठ बांधली आणि जसा जसा वेळ मिळाला तशा परीक्षा दिल्या आणि आज बीए पास झालो, असं शिंदे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post