करोना लसीच्या सकारात्मक बातम्यांमुळे सोन्याचे दर घसरले
ऑगस्टच्या तुलनेत ६ हजारांची घट
नवी दिल्ली: डॉलरमध्ये आलेली मजबुती, कोरोना लशीसंदर्भातील सकारात्मक बातमी यामुळे सोन्याचांदीची झळाळी उतरली आहे.
ऑगस्टमध्ये सर्वोच्च स्तरावर पोहोचल्यानंतर सोन्याचे दर 6000 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत.
सलग चौथ्या दिवशी या सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर चांदीची वायदा किंमत 0.8 टक्केने उतरले आहेत. या घसरणीनंतर भाव 62,043 रुपये प्रति किलो झाले आहेत. आज सोन्याचे भाव जवळपास 450 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदी 718 रुपयांनी कमी झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळा या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. यामध्ये आतापर्यंत साधारण 6000 रुपयांची घसरण झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते सोन्याचे भाव 50,000 रुपये प्रति तोळाहूनही खाली येण्याची शक्यता आहे. मात्र सध्या 49,550 ची सपोर्ट लेव्हल पाहायला मिळू शकते. चांदीचे दर 62,000 रुपये प्रति किलो पेक्षा कमी होऊ शकतात.
Post a Comment