ग्राहकांना मिळणार १०० टक्के शुद्ध सोन्याची हमी, केंद्र सरकारचा लाखमोलाचा निर्णय

 ग्राहकांना मिळणार १०० टक्के शुद्ध सोन्याची हमी, केंद्र सरकारचा लाखमोलाचा निर्णयनवी दिल्ली : सोनं खरेदी करताना शुद्धतेबाबत ग्राहकांची  फसवणूक होऊ नये यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. ज्यामुळे ग्राहकांना १०० टक्के शुद्ध सोनं मिळेल. सध्या सोनं-चांदीची शुद्धता मोजण्याचे काही मापन नाहीय. त्यामुळे अनेकदा ग्राहकांची फसवणूक होत असते.

सोन्याच्या आभूषणांवर हॉलमार्किंग १ जुलै २०२१ पासून लागू होणार आहे. नव्या नियमांनुसार २२ कॅरेटचे सोने सांगून कमी कॅरेटचे सोने विकणाऱ्या ज्वेलर्सना दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो. देशात हॉलमार्कींग केंद्राची संख्या वेळेनुसार वाढवली जाणार आहे. या वेळेस देशात ९०० च्या आसपास हॉलमार्कींग केंद्र आहेत, जे आणखी वाढवले जातील. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post