वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचं आवाहन

 वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचं आवाहननगर : शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचं जाहीर केले आहे. यावर्षी असलेला करोना म्हातारीचा प्रादुर्भाव तसेच शिवसेना उपनेते अनिल राठोड व जि.प.सदस्य अनिल कराळे यांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचं गाडे यांनी जाहीर केले आहे. याबाबत सोशल मीडियावर त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

नमस्कार मिंत्रानो,

दि.१९/११ रोजी माझा वाढदिवस असतो पण ह्या वर्षी मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही,कारण  शिवसेना  परिवारातील शिवसेना उपनेते मा. मंत्री स्व. अनिलजी भैय्या राठोड व  जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना उपजिल्हाप्रमुख (नगर)   स्व.अनिल जी कराळे  यांचे  दुःखद निधन झाल्यामुळे,मी ह्या वर्षी वाढदिवस साजरा करणार नाही.काही महिन्यांपासून राज्यच नाहीतर देशभरात आपल्यावर आणि आपल्या सर्वच सण उत्सवांवर कोरोना (कोव्हीड-१९) आजाराचे सावट आहे. तसेच माझ्या कुटुंबातील व्यक्ती,काही जेष्ठ व तरुण सहकाऱ्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.अशा परिस्थितीत माझा वाढदिवस साजरा करणे योग्य नाही, त्यामुळे मी वाढदिवस साजरा करणार नाही.

याची सर्व हितचिंतकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती.

धन्यवाद..!


आपलाच 

प्रा. शशिकांत गाडे सर

शिवसेना जिल्हाप्रमुख नगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post