अदभूत घटना, नेत्ररूग्णाने स्वत:च स्वत:ला केले नेत्रदान आणि अंधत्व झाले दूर

 अहमदनगरला घडली अदभूत घटना,  नेत्ररूग्णाने स्वत:च स्वत:ला केले नेत्रदान आणि अंधत्व झाले दूर

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रकाश कांकरिया यांची थक्क करणारी कामगिरीअ.नगर- डोळयावर (बुबुळावर) टीक पडल्यानंतर येणारे अंधत्वाचे प्रमाण भारतात मोठया प्रमाणात आहे. त्यासाठी कोणीतरी मरणोत्तर नेत्रदान केल्या नंतर हे डोळे काढून नेत्रपेढीकडे जमा करावे लागतात व नंतर कोणा निष्णात डोळयांच्या विशेष सर्जनकडून ही अवघड नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया केल्यानंतर ह्या अंध व्यक्तीला दृष्टी प्राप्त होऊ शकते. दरम्यान - महीने कोरोनाच्या संकटामुळे मृत झालेल्या व्यक्तिंचे मरणोत्तर नेत्रदान होऊ शकत नसल्यामुळे नेत्ररोपणाच्या शस्त्रक्रिया होऊ शकत नव्हत्या.

 सुमारे 2 महिन्यांपूवी लक्ष्मणराव बोहरे (वय 80,रा. परांडा, जि.उस्मानाबाद) यांच्या एका डोळयात अपघाताने जखम झाल्यामुळे व त्यात जंतू संसर्ग झाल्यामुळे टीक पडली. त्यांचा दुसरा डोळा अनेक वर्षापासून मेंदूपासून येणारी नस बंद पडल्यामुळे पूर्णपणे अंधत्व आले होते. लक्ष्मणराव त्यांच्या भागात उपचार होत नसल्याने अहमदनगरला साई सूर्य नेत्रसेवा ह्या संस्थेत आले. सध्या मरणोत्तर नेत्रदानाचे प्रमाण कमी असल्यानं बुबुळ उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना तो जंतू संसर्ग झालेला डोळा काढून टाकणे हाच पर्याय होता. परंतू नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया ह्यांना एक कल्पना सूचली. डोळयाची नस बंद असल्यामुळे डावा डोळा हा अनेक वर्षापासून पूर्णपणे अंध व निकामी झाला होता. पण त्याचे बुबुळ चांगले होते. डॉ. कांकरिया यांनी त्यांच्या डाव्या डोळयाचे बुबुळ काढून उजव्या डोळयावर रोपण केले व त्या डोळयाने त्यांना दिसू लागले. त्यामुळे त्याला व त्यांच्या नातेवाईकांना मोठा आनंद झाला. अशी घटना दुर्मिळ असल्यामुळे व ती यशस्वी झाल्यामुळे अशीही अंधत्वावर मात करता येते. ह्या घटनेचे आखील भारतीय नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. महीपाल सचदेव व आयबँक असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष पद्मश्री प्रो. डॉ. जीवन टिटियाल ह्यांनी नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया ह्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. ह्या उपक्रमात डॉ. अनिल सिंग तसेच डॉ. चिन्मय ब्रम्हे व साई सूर्य नेत्रसेवाच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले आहे. स्वत:चेच स्वत:ला नेत्रदान अशी जगातील अद्भूत घटना घडली व ती यशस्वी झाली त्यांचे विशेष समाधान लाभल्याचे डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ. सुधा कांकरिया मानकन्हैय्या नेत्रपेढी तर्फे व्यक्त केले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 


Sai Surya Netra Seva
Vardhman Manik Chowk
Ahmednagar
ph 0241-2341417

http://www.saisuryasupervision.com


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post