नगरच्या बायपास रोडवर एकाची गळा चिरुन निर्घुण हत्या

 नगरच्या बायपास रोडवर एकाची गळा चिरुन निर्घुण हत्यानगर : नगरमधील कल्याण रोड बायपासजवळील एका पेट्रोल पंपाजवळ गाडीवर ड्रायव्हरचे काम करणार्‍या रामदास बन्सी पंडीत (रा.निंबळक, ता.नगर) याची गळा चिरुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पंडित खासगी चालक म्हणून काम करत होते.  हा खून कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रामदास पंडित हे केडगाव येथे चालक म्हणून कामाला आहेत. बुधवारी रात्री त्यांनी केडगाव येथून घरी येत असल्याची माहिती फोन करून घरच्यांना दिली होती. यानंतर रामदास घरी आले नाही व त्यांचा फोन बंद येत होता. त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. गुरुवारी सकाळी रामदास पंडित यांचा मृतदेह कल्याण बायपासजवळील लामखडे पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या खूणा आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपअधीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post