कोविडची दुसरी लाट येवू शकते, दिवाळी जपून साजरी करा....व्हिडिओ
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे आवाहन
नगर : सरकारच्या आरोग्य यंत्रणांनी देशात कोविडची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर नगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनीही नगर जिल्हावासियांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना कोविडच्या दुसर्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. दिवाळी साजरी करताना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. दिवाळीनिमित्त एकमेकांच्या भेटीगाठी वाढतात. बाजारात तसेच इतरत्रही मोठी गर्दी होते. याबाबत विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोविड नंतरचा हा पहिलाच मोठा सण आपण सगळे साजरा करीत असून योग्य काळजी घेवूनच सणाचा आनंद लुटावा, प्रदूषण लक्षात घेवून फटाके वाजवणे टाळावे असे आवाहन करीत जिल्हाधिकारी भोसले यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
व्हिडिओ
Post a Comment