वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींना 'दिवाळी भेट' किटचे वाटप

   वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींना 'दिवाळी भेट' किटचे वाटप 

श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट आणी अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचा पुढाकार 


अहमदनगर - शाळेमधल्या वर्गातील मॉनिटर प्रमाणे प्रत्येक गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवणारे वृत्तवाहिनींचे प्रतिनिधी कोरोना आणी कोरोनामुळे झालेल्या  लॉकडाऊन काळात देखील आपले कर्तव्य पार पाडत होते,  लॉकडाऊन काळात कार्यरत असतांना जन सामाण्यांंसाठी देखील खऱ्या अर्थाने एक कोरोना योद्धाची भूमिका त्यांनी पार पाडली त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने घेण्यात येणारे उपक्रम हे कौतुकास्पद असुन भविष्यात साई द्वारका सेवा ट्रस्ट हि संस्था देखील इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या खांद्याला खांदा लावून काम करणारं असल्याची प्रतिक्रिया श्री साई द्वारका सेवा ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी दिली आहे.

श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट आणी अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींना दिवाळी भेट म्हणून किराणा किटचे वाटप माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे पदाधिकारी व वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.

श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट आणी अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'दिवाळी भेट' या आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांचा सत्कार मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष उमेर सय्यद यांनी तर उपस्थित पाहुण्यांचा सत्कार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर दूस्सल यांनी केलें असुन आभार सुशील थोरात यांनी मानले, 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post