....अखेर दिव्यांग शिक्षक झाले मुख्याध्यापक

 ....अखेर दिव्यांग शिक्षक झाले मुख्याध्यापक


संघटनेने केले प्रशासनाचे हार्दिक अभिनंदन.
अहमदनगर -गेल्या  नऊ वर्षापासून प्राथमिक शिक्षकांचे रोस्टर तथा सेवाजेष्ठता यादी न झाल्यामुळे दिव्यांग शिक्षकांचे मुख्याध्यापक व शिक्षण विस्तार अधिकारी पदाचे प्रमोशन रखडले होते .महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रमोशनची सतत मागणी होत होती .यापूर्वी दिव्यांग बांधवांना डावलून मुख्याध्यापक व विस्ताराधिकारी प्रमोशन झाले होते .त्यामुळे यावेळेस दिव्यांग शिक्षकांचे प्रमोशन होईल की नाही ,याबाबत दिव्यांग शिक्षक साशंक होते. जिल्ह्यातील अनेक दिव्यांग बांधव प्रमोशन साठी आतुर झाले होते.अखेर संघटनेच्या प्रयत्नांना प्रशासनाने साद घालून दिव्यांग शिक्षकांना  काल अगोदर प्रमोशन दिले. यामुळे दिव्यांग शिक्षकांना आपल्या सोयीच्या व जवळच्या शाळा मिळाल्या.

 अल्पदृष्टी ,कर्णबधिर, अस्थिव्यंग या दिव्यांग प्रवर्गातून  37 दिव्यांग शिक्षकांना काल जिल्हा परिषदेने मुख्याध्यापक पदाचे प्रमोशन दिले आणि गेल्या नऊ वर्षापासूनची दिव्यांग शिक्षकांची प्रतीक्षा अखेर काल संपुष्टात आली. दिव्यांग संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री क्षीरसागर साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, वासुदेव साळुंके, शिक्षणाधिकारी श्री रमाकांत काटमोरे ,उपशिक्षणाधिकारी  रमजान पठाण यांचे संघटनेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.गेल्या दोन महिन्यापासून शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व संबंधित कर्मचारी यांनी या कामासाठी खूप मेहनत घेतली. काल दिवसभर दिव्यांग शिक्षकांच्या ग्रुप वर नवनिर्वाचित मुख्याध्यापक व सर्व प्रशासनाचे संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून अभिनंदन केले. संघटनेच्यावतीने प्रमोशनसाठी जिल्हाध्यक्ष  साहेबराव अनाप, मार्गदर्शक श्री दत्तात्रेय जपे, सचिव पोपट धामणे ,कार्याध्यक्ष राजू आव्हाड ,राजेंद्र औटी , बन्सी गुंड, भाऊराव नागरे,उद्धव थोरात, संतोष सरवदे,प्रेमनाथ डोंगरे, साहेबराव मले ,दादासाहेब गव्हाणे,खंडू बाचकर ,अनिल घोलप आदींनी वेळोवेळी प्रशासनाच्या भेटी घेऊन दिव्यांग प्रमोशन बाबत सातत्याने मागणी केली होती


जिल्हा दिव्यांग संघटनेने गेल्या चार वर्षात सुमारे 185 प्राथमिक शिक्षकांचे फरकासह वाहन भत्ते मंजूर केले आहे .संघटनेतर्फे गुणवंत कर्मचाऱ्यांना दिव्यांग भूषण पुरस्कार सुरू केले, जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने विशेष रजा मंजूर केली आणि आज 37 दिव्यांग शिक्षकांना  मुख्याध्यापक व तीन शिक्षकांना शिक्षण विस्ताराधिकारी पदाचे प्रमोशन मिळाले ,ही माझ्या कारकीर्दीतील सर्वात आनंदाची बाब आहे..

     जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post